वणी :- परशुराम पोटे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ व लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दिनांक ४ जुलै रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात देशातील महिंद्रा, टिव्हिएस यांच्यासह नामवंत विविध १२ कंपन्या वणी शहरात येवून उमेदवार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार आहेत.
या कंपन्यामध्ये एकुण २३६५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आपल्या उपविभागातील विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या मेळाव्याला उद्घाटक म्हणुन खासदार बाळूभाऊ धानोरकर तर अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे उपस्थित राहणार आहे.
विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र नगरवाला, अध्यक्ष शि.प्र.मंडळ वणी, संजय देरकर, उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आयोजक सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, श्रीमती विद्या शितोळे, प्राचार्य डॉ.प्रसाद खानजोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला १० वी १२ वी आ. टी.आय. डिप्लोमा, पदविकाधारक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक श्रीमती विद्या शितोळे सहाय्यक आयुक्त जि.कौ.वि.रो. व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, टिकाराम कोंगर अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ, प्रसाद खानजोडे प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी केले आहे.