युवराज डोंगरे/खल्लार
दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील शेततळ्याचे पाणी दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात आऊटलेट नसल्यामुळे दरवर्षी शिरत असुन याबाबत संबंधित शेतकऱ्याने कृषि विभागाकडे तक्रारीही केल्या मात्र आश्वासनाशिवाय दुसरी कोणतीही कारवाई झाली नाही यामुळे शेतकऱ्याने नुकसानभरपाई सोबत कारवाईची मागणी केली आहे असे न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे
दादाराव सहदेव खडे व वामन सहदेव खडे यांच्या शेताजवळ जयप्रकाश देशमुख यांनी शेततलाव खोदला आहे त्या तलावाचा आऊटलेट नसल्याने दरवर्षी खडे यांच्या शेतात पाणी साचते व पिकांचे नुकसान होते याबाबत कृषि विभागाकडे वारंवार तक्रारी दिल्यात मात्र आश्वासनाशिवाय कृषि विभागाने काहीही केले नाही
पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असुन खडे यांनी शेतात कपाशी पेरली आहे दि 3 जुलै झालेल्या पावसाचे पाणी शेतात शिरुन शेताला तलावाचे स्वरुप आले आहे
कृषि विभागाकडून मागिल दोन वर्षांपासून मजुर लाऊन नाली खोदून पाणी काढण्यात आले होते नंतर शेतातील तलावातील पाण्याचा आऊटलेट उन्हाळ्यात काढून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु कृषि विभागाने तसे केले नाही
सध्यस्थितीत तलाव तुडुंब भरला आहे व खडे यांनी शेतात पेरलेल्या कपाशीचे पिक सडत आहे याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे.