गडचिरोली:गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन दि. 06/07/2022 रोजी गडचिरोली पोलीस दल व कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोेली यांचे संयुक्त विद्यमाने ‘भव्य कृषी मेळावा’ पोलीस उपमुख्यालय प्राणहिता परिसरात पार पडला.

      यावेळी उपस्थित असलेल्या अहेरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील 300 आदिवासी शेतक­यांना धान व सोयाबिन बि-बियाणे तसेच आंबा, चिकू, फणस, लिंबु, शेवगा इ. फळझाड रोपांचे विनामुल्य वाटप करण्यात आले. सदर कृषी मेळाव्यात उपस्थित शेतक­यांना अत्याधुनिक शेती, पीक पध्दती, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी कर्ज, पीक विमा, कृषी विभागाच्या विविध योजना, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतक­यांनी कृषी मेळाव्याचे माध्यमातुन शेतीसंबंधी विविध माहिती जाणुन घेण्यास मिळाल्याबाबत अभिप्राय व्यक्त केला. 

आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 484, नर्सिंग असिस्टंट 1143, हॉस्पीटॅलीटी 305, ऑटोमोबाईल 254, इलेक्ट्रीशिअन 142, प्लंम्बींग 27, वेल्डींग 33, जनरल डयुटी असिस्टंट 103, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52 असे एकुण 2554 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 105 मत्स्यपालन 60 कुक्कुटपालन 457, बदक पालन 151, शेळीपालन 80, शिवणकला 137, मधुमक्षिका पालन 32, फोटोग्राफी 35, भाजीपाला लागवड 540, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 780, टु व्हिलर दुरुस्ती 34, फास्ट फुड 35, पापड लोणचे 30, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 370, एमएससीआयटी 200 असे एकुण 2982 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

      याप्रसंगी उपस्थित शेतक­यांना मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले तसेच नक्षलवाद्यांच्या खोटया चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा. गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. 

       यावेळी कृषी मेळाव्यास मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. अनुज तारे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अमोल ठाकुर तसेच कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे विषय विशेषतज्ञ मा. श्री बुध्दावार हे उपस्थित होते.

 सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अमोल ठाकुर, प्रभारी अधिकारी पोस्टे मुलचेरा सपोनि. श्री. अशोक भापकर, प्रभारी अधिकारी उपपोस्टे पेरमिली पोउपनि. श्री. धवल देशमुख, प्रभारी अधिकारी उपपोस्टे राजाराम (खां.) पोउपनि. श्री. रविंद्र भोरे, प्रभारी अधिकारी उपपोस्टे व्यंकटापूर पोउपनि. श्री. मिलिंद कुभारे, प्रभारी अधिकारी पोमके येलचिल पोउपनि. श्री. प्रविण माने तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व नागरी कृती शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथील अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News