चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी

भंडारा(लाखनी):- लाखनी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रभाग क्रमांक 01 ते 17 मध्ये डास प्रतिबंधक उपाय करण्यासाठी फॉगिंग मशीन द्वारे धुर फवारणी करण्याबाबद भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

काही दिवसापासून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखनी शहरातील नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यास नाकारता येत नाही. त्यातच पाऊस अधुन-मधून येत असतो. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.यामुळे अनेक आजारांनी डोकेवर काढले असून पावसामुळे वातावरणात बदल झाले. लाखनी शहरातील एक ते सतरा प्रभागामध्ये नाल्यांमध्ये तसेच छोट्या-मोठ्या पावसाचे पाण्याचे निचरा होत नसल्यामुळे डबक्यांमध्ये पावसाचे पाणी अनेक दिवस साचून असते. त्यामुळे त्या ठिकाणी डास वास्तव्यास असतात या वर प्रतिबंधात्मक उपाय मनुन फॉगिंग मशीन द्वारे धुर फवारणी ची गरज निर्माण झाली आहे.याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन शहरांमध्ये फॉगिंग मशीन द्वारे धुर फवारणी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्या मार्फत करण्यात आली. निवेदन देते वेळी भाजपा गटनेता तथा नगरसेवक संदीप भांडारकर, नगरसेवक सत्यवान वंजारी,नगरसेवक महेश आकरे,माजी नगरसेवक विक्रम रोडे,नगरसेवक अश्विन धरमसारे,सभापती सौ.लताकाकु रोडे,नगरसेविका सौ.सविताताई सोनवाने,नगरसेविका सौ.सारिकाताई बशेशंकर उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com