दि.05/07/2022

सावली :(सुधाकर दुधे)

दिनांक 05/07/2022 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आझादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने पंचायत समिती, सावली अंतर्गत येणाऱ्या व्याहाड बूज – हरंबा प्रभागातील समता महिला प्रभाग संघ, उपरी येथील प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशन कार्यक्रम उपरी येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये प्रभागसंघाचे लेखापुस्तक, आर्थिक विवरण पत्रक व लेखापरिक्षणासाचे वाचन करण्यात आले. तसेच पुढील आर्थिक वर्षासाठी वार्षिक कृती आराखडा व अंदाजपत्रकासह वार्षिक अहवाल तयार करण्यात आला. यावेळी सन 2021-22 मध्ये झालेली प्रगती व पुढील वर्षातील वाटचाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रभाग संघ अध्यक्ष मा.सौ. शुभांगी ताई सातपुते, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले मा. श्रीमती सुनीता मरस्कोले मॅडम (संवर्ग विकास अधिकारी,पं.स. सावली) सहउद्घाटक मा. श्रीमती कुमुद ताई सातपुते (सरपंच उपरी) प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.श्री रवींद्र बोलीवार ( माजी उपसभापती पं स,सावली ) मा. श्री गणपतजी कोठारे ( माजी प. स.सदस्य ) मा.श्री पांडुरंग शेट्टे (पोलीस पाटील उपरी), मा.श्री.नागोराव कोठारे (तंटा मुक्ती अध्यक्ष) मा.सौ शारदा कोहळे, (प्रभागसंघ सचिव) मा.सौ गोदावरी भोयर(प्रभागसंघ कोषाध्यक्ष )श्री नामदेव रागीट(जि. प. शाळा मुख्यध्यापक उपरी) सौ शुभांगी बारसागडे (सरपंच भान्सी)तथा सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच पंचायत समिती उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक कु.कल्पना देवाळकर ,तालुका व्यवस्थापक प्रतीक्षा गेडाम ,प्रभाग समन्वयक, श्री राजेश्वर मडावी,कु.शुभांगी धनबते ,भूषण चिलकेवार उपस्थित होते.संचालन मा खोब्रागडे सर जी.प.शाळा उपरी व आभार प्रदर्शन CRP अंतकला मेश्राम यांनी केलं.तसेच समुह संसाधन व्यक्ती ,बँक सखी आरोग्य सखी,कृषी व पशु सखी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com