७४ व्या प्रजासत्ताक दिनी सर्वोत्कृष्ट संचलन केल्याबद्दल गडचिरोली व गोंदिया सी – ६० पथकाला मिळाले प्रथम क्रमांकाचे चषक….

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

     जगातील कोणतेही सशस्त्र दल वा सुरक्षा दल असो, राष्ट्रीय दिनी संचलन करणे हा एक महत्वाचा अविभाज्य घटक असतो. महाराष्ट्रात देखिल पोलीस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे, एकजुटीचे प्रदर्शन संचलनाच्या माध्यमातून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दाखवितात. याप्रमाणे २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिन रोजी झालेल्या संचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे चषक देण्यात येतो. त्याकरीता गठित करण्यात आलेल्या निवड समीतीने उत्कृष्ट संचलनासाठी तीन पथकांची निवड काल दिनांक १९/०४/२०२३ रोजी केली आहे.

     यामध्ये गडचिरोली पोलीस दल व गोंदिया पोलीस दलाच्या सी. ६० पथकाने संयुक्तरित्या – गौरवास्पद कामगिरी करुन २६ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे झालेल्या संचलनामध्ये सर्वोत्कृष्ट संचलन करुन प्रथम क्रमांकाचे चषक पटकाविले आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले जात आहे.

      प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये सर्वोत्कृष्ट संचलन करणाऱ्या पथकांना १ मे २०२३ महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनी अपर पोलीस महासंचालक सा. (प्रशासन) म. रा. मुंबई यांच्या हस्ते चषकाचे वितरण करण्यात येणार आहे. त्याबाबतची रंगीत तालीम दिनांक २९/०४ / २०२३ रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. गडचिरोली पोलीस दलाचे सी. – नक्षलविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतातच, त्याचसोबत आपल्या शिस्तीचे आणि ६० पथके एकजुटीचे प्रदर्शन त्यांनी संचलनातून दाखवून दिले आहे. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी संचलनात सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे कौतुक केले व भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.