ऋग्वेद येवले नागपूर विभागीय प्रतिनिधी

 

साकोली : रा.प.मं साकोली आगारात महिला वाहक यांच्या वैयक्तीक पर्समधून ३३०० काढून त्यांना नोकरीवरून कमी करण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार साकोली बस स्थानक येथे दिनांक १० जूनच्या दूपारी ३:१५ ला घडला याबाबत सदर महिला वाहकाने पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. पण कारवाईच होत नसल्याने दि. 05 जुलैला वाहक मिना जीवने यांनी पत्रकार परीषद घेत याची चौकशी करून न्याय देण्यासाठी मागणी केली आहे.

    साकोली आगारात मिना जीवने या महिला वाहकाने बस क्र. एमएच ०७ सी ९०६९ वरून १० जून ३:१५ आपली ड्यूटी आटोपून आली असता बस स्थानक गेटवर आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी वाहतुक नियंत्रक माधुरी मेहर, तिकीट निरीक्षक एकनाथ शहारे, हरी रघुवंशी, मिश्रा व डहाके यांना बोलवून या महिला वाहकाची चौकशी करण्यास सांगितले व रापमं कैश तपासल्यावर नगदी ११८८५, पोलीस वॉरंटचे ९५ रू, १०० अग्रधन असे एकुण १२०८० रू माधुरी मेहर यांना दिले त्यानंतर त्यांनी या महिला वाहकाची वैयक्तीक पर्स त्यांजवळून हिसकावून बैग मध्ये असलेले ३३०० जबरदस्तीने काढून घेतले. व आगार व्यवस्थापक यांनी महिला वाहकास तु आमच्यासोबत खाजवू नको नाहितर तुला निलंबित करू अशी धमकी दिली. सदर महिला वाहकाने पोलीस ठाणे साकोलीत ही तक्रार दाखल केली असून त्या पर्समधे या महिला वाहकाची सोन्याची आंगठी व मंगळसुत्र दोन्ही अंदाजे 37000 असून मिना जीवने या महिला वाहकाने पत्रकार परीषद घेत मागणी केली की याची सखोल चौकशी करून त्यांची अंगठी, एटीएम, कागदपत्रे, मंगळसुत्र व वैयक्तीक रक्कम 3300 परत मिळावे व झालेल्या अन्याय मनस्तापाबाबद दोषींवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी पत्रपरिषदेतून मीना जीवने हिने केली आहे. 

 

रा. प. रोकड जास्त आढळल्याबाबत प्राथमिक अहवाल-

_दिनांक 10 जून 2022 रोजी नियत क्रमांक 52 च्या नागपूर ते साकोली फेरीवर चालक चंद्रकुमार भाजीपाले व वाहक मीना जीवने हे कामगिरी करीत असताना साकोली बसस्थानकावर अंदाजे 15.00 वा. आगार व्यवस्थापक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षणार्थी), हरिसिंग रघुवंशी, एकनाथ शहारे वाहतूक नियंत्रक रा. प साकोली यांनी सदर वाहकाची रा.प. रोकड तपासणी केली असतात ती ETIM मध्ये नमूद रक्कमेपेक्षा 3302/- रुपये ने जास्त आढळली. याबाबत वाहक सौ मीना जीवने यांनी समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर दिले. तपासणी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली आणि गैरवर्तणूक केली. ईटीआय मशीन व एटीएम कार्ड, बॅग आ. व्य. दालनात फेकून दिले आणि रा. प. रोकड मोजणी नमुना अर्जावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तसेच माझे पैसे परत द्या, म्हणून धिंगाणा घातला. सदरची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलीस स्टेशन साकोली येथे जाऊन तपासणी अधिकारी यांच्या विरुद्ध खोटी चोरीची तक्रार दिली. याबाबत पोलिस स्टेशन साकोली येथे चौकशी सुरू आहे. सदर वाहकाचे गैरवर्तणुकीबाबत व जास्तीची रक्कम आढळल्याबाबत अहवाल सादर करण्यात येत आहे._

करिता माहिती व योग्य कार्यवाहीस्तव सादर.

 

आगार व्यवस्थापक 

राज्य परिवहन साकोली

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com