अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय देलनवाडी व संयुक्त वन व्यवस्थापन समिती उराडी यांच्या संयुक्त विद्यमाने उराडी येथे विविध जातीच्या 135 वृक्षांची लागवड करून वन महोत्सव साजरा करण्यात आला.
उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी वडसा विभागांतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वन महोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनाखाली देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांच्या पुढाकाराने देलनवाडी अंतर्गत येणाऱ्या उराडी येथे पहिला वन महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उराडी येथील सरपंच सोनी वटी, उपसरपंच राधेश्याम दडमल, माजी पंचायत समिती सदस्य वर्षा कोकोडे, गोमा करंगामी, चरणदास कोकोडे, युवराज वाघ आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी क्षेत्र सहाय्यक एस. व्ही. नारनवरे, के. टी. कुडमेथे, बीट वनरक्षक आर. पी. नन्नावरे, पी. के. धाडसे ,व्ही. व्ही .राऊत, एम. के. अलोने, डी.डी. वडे व वनमजूर यांनी सहकार्य केले.