विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर
दखल न्युज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या वहिनींची रात्रोला प्राणज्योत मालवली असून मुळ गाव असलेल्या कोटगाव येथे त्यांच्या पार्थिव देहाला आज चिताग्नी देण्यात येणार आहे.
मृतक संकुतलाबाई देवीदास रामटेके यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारार्थ मोठे चिरंजीव अॅड.विलास देविदास रामटेके यांनी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात भर्ती केले होते.
मात्र,आरोग्य सुधारणे संबंधाने शरीर प्रतीसाद देत नसल्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार मुळ गाव असलेल्या कोटगावला आणण्यात आले होते.
अखेर सौ.संकुतलाबाई देवीदास रामटेके यांची काल रात्रोला प्राणज्योत मालवली.यामुळे संपुर्ण रामटेके परिवार व इतर आप्त नातेवाईक शोकाकुल असून आज आणि उद्या सदर मृत्यू प्रक्रिया अंतर्गत व्यस्त असणार आहेत.