द़खल न्युज भारत:शंकर महाकाली
सहायक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर
बल्लारपुर:नुकतीच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या सूचनेनुसार व राज्य कोर कमेटीच्या ठरावा नुसार एक मतांनी पुरोगामी पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सुजय वाघमारे यांची निवड करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर निवासी सुजय वाघमारे यांनी आजवर चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा नंतर चंद्रपूर जिल्हा प्रभारी व चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी पदभार सांभाळला एका विभागीय वृत्तपत्राचे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी आहे.सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्याने सुजय वाघमारे यांची चंद्रपूर जिल्हा पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने सामाजीक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.