दख़ल न्युज भारत:शंकर महाकाली

सहायक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले व यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बांबुपासून तयार करण्‍यात आलेला तिरंगा ध्‍वज भेट देत आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांचे स्‍वागत केले.

राज्‍यातील दीन, दुर्बल, शोषित,पिडीत, उपेक्षित, वंचित जनतेच्‍या समस्‍या मार्गी लावत राज्‍याला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करण्‍यासाठी आपणास बळ लाभावे अशी प्रार्थना सिध्‍दीविनायकाचरणी करत असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्‍व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्‍व. आनंद दिघे यांचा हिंदुत्‍वाचा विचार घेवून महाराष्‍ट्राचे कल्‍याण करण्‍यासाठी निघालेल्‍या एकनाथराव शिंदे यांच्‍यासोबत आपण सर्वशक्‍तीनिशी असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. यावेळी झालेल्‍या चर्चेत चंद्रपूर जिल्‍हयातील विविध समस्‍या व प्रश्‍नांबाबत आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबत लवकरच आढावा घेत हे प्रश्‍न मार्गी लावण्‍याबाबत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी दिले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com