दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
अंधश्रद्धेच्या भयंकर मायाजाळ्यात खितपत पडलेल्या समाजाला जुन्या रुढीतून बाहेर काढले आणि प्रबोधनाच्या सातत्यपुर्ण धाग्याने योग्य ते कर्म शिकवण्याचे काम संतांनी व थोर विचारवंतानी केले.
त्यात चिमूर क्रांती नगरीत जे स्वातंत्र्याचे बीजे पेरली ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजन व कलागुनानी हे आपण नाकारू शकत नाहीत.
1 मे हा कामगार दीन म्हणून साजरा करतो.त्याचे शिलेदार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि 12 तास काम करणारा कामगार भारतीय संविधानमुळे 8 तास काम करतो व महिलांना भर पगारी 6 महिने प्रसूती रजा मिळत असल्याचे प्रतिपादन कलाकारांच्या मेळाव्या प्रसंगी प्रकाश मेश्राम यांनी केले.
गुरुदेव सेवा मंडळ चिमूर येथे कलाकारांना प्रबोधन करताना प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश मेश्राम यांनी आपले विचार मांडले.
विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सरिकताई उराडे (महिला विभाग प्रमुख महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती नाशिक,)तर प्रमुख अतिथी प्रकाश मेश्राम (चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष महारष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती चंद्रपूर,)यशवंत उरदे,रवींद्र उमाटेविदर्भ प्रमुख,कवडुजी गोंगले (विदर्भ पदाधिकारी चंद्रपूर),श्री. रामदास राऊत जेष्ठ विचारवंत चिमूर,डॉ.शिलवंत मेश्राम नाट्य कलावंत चिमूर हे विचार मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला चिमूर तालुक्यातील 200 कलावंत उपस्थित होते.गेल्या 4 ते 5 वर्षापासून मानधन का मिळाले नाही यावर चर्चा झाली.
चिमूर तालुका अध्यक्ष म्हणून डॉ. शिल्वांत मेश्राम यांनी तर सचिव म्हणून रामदास राऊत यांची निवड केली.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रकाश मेश्राम चिमूर यांनी केले तर आभार रतिराम डेकाते कोलारा यांनी मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.