लेखक
अनंत भवरे
संविधान विश्लेषक,नांदेड..
आम्ही भारताचे लोक…….
म्हणून पहिल्यांदा जेंव्हा उद्देशीकेचा ( वाचन नव्हे तर संकल्प ) निर्धार झाला…
तो निर्धार आज 2024 च्या काळात केवळ वाचनाच्या बाहेर प्रयोगातून कधी आलाच नाहीं.
या उद्देशीकेचेही अगदी त्याप्रमाणेच झाले.
जसे……
संपूर्ण जग पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात होरपळून निघाल्यामुळे,असे युद्ध कधीही या पृथ्वीतलावर घडू न देण्यासाठीच प्रमुख राष्ट्रानी पुढाकार घेऊन UNO ची निर्मिती 24/10 1945 रोजी केली.
त्यानंतर 10 /12 / 1948 रोजी संपूर्ण जगासाठी महायुद्धाचे मूळ उगम असलेल्या कारणावरच घाव घातला तो म्हणजे,”आल्फ्रेंड नोबेल,यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून 30 कलमाचा……
जागतिक मानवी हक्काचा घोषित करूनच…..
परंतू,त्याचबरोबर हा जाहीरनामा केवळ घोषित करूनच थांबले नाही.तर त्याच दिवशी जगातील सर्व लोकशाहीवादी देशांच्या सरकारांना UNO ने आवाहन केले होते की,त्यांनी त्यांच्या देशातील शाळा,महाविद्यालयातून शिक्षक,प्राध्यापकामार्फत या 30 कलमाचे वाचन आणि विश्लेषण आणि तशी कृती करवून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते…..
परंतू ,ती 30 कलमे गेल्या 75 वर्षात निदान आमच्या देशातील किती प्राध्यापक शिक्षकांना माहित आहेत?
हा संशोधनाचा विषय आहे….!
याचप्रमाणे जगाच्या पटलावर या 30 कलमाचं मातेरं ज्या पद्धतीने होऊन पुन्हा तिसऱ्या व अंतिम जागतिक अणुयुद्धाची खुमखूमी बहुतेक राष्ट्रात निर्माण होऊन जग नष्ट होण्याची टांगती तलवार आमच्या डोक्यावर ज्याप्रमाणे आहे.
अगदी याप्रमाणेच……
आमचा देश यापुढे परकी्यांच्या गुलामीत कायमस्वरूपी जाऊ न देण्यासाठीच……
26 नोव्हेंबर 1949 रोजी……..
22 भागात, 8 परिशिष्टात, 395 कोहिनुर हिरे असलेले भारतीय संविधान,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून निर्मून संविधान सभेचे अध्यक्ष…….
डॉ. राजेंद्र प्रसाद यांना अर्थात देशाला प्रदान केली.
तत्पूर्वी……
आम्ही भारताचे लोक…..
या उद्देशीकेच्या प्रयोगाचा दृढसंकल्प करून निर्धार करून ती जबाबदारी आमच्यावर टाकली….
म्हणजे ही कामगिरी अशी होती की,( डॉ. दिनकर खाबडे यांच्याच शब्दात सांगावयाचे म्हटले तर हे पुढील उदाहरण प्रथम अस्पृश्य समाजाला लागू पडून संविधान निर्मितीला सुद्धा लागू होते )…..
की,”ज्याप्रमाणे एखादी पक्षीनी आपल्या पिलांसाठी चोचित चारा घेऊन भरधाव वेगाने आपल्या घराट्याकडे धाव घ्यावी…….
वाटेत अनेक मोठ्या हिंस्त्र पक्षांनी तीच्यावर हल्ला करावा.तश्याच जखमी अवस्थेत कसेतरी घरट्यापर्यंत पोहचून आपल्या पिलांच्या तोंडात चारा टाकावा आणि प्राण सोडावा….
असे मानवतेसाठी,देशासाठी,समाजासाठी,आमच्या सर्वासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते…….
परंतू ,जगात हुकूमशाही प्रवृत्तीमूळे UNO ला संपवण्याचा घाट घातला.
आणि या देशात संविधानाला संपवण्याचा घाट RSS ने कांही राजकीय पक्षांना हाताशी धरून घातला….!
परंतू,या संविधानाला जपून….
तीचे वाचन करून…..
समजून घेऊन…..
जागृत होऊन……
कृतीतून अविष्कारीत होऊन……
डोळ्यात तेल घालून….
जपण्याची जबाबदारी आम्हा 140 कोटी लोकसंख्येची आहे….
त्यासाठी उद्देशीकेचे वाचन पुरेसे अजिबात नाही तर…….
त्याला विवेकातून कृतीची जोड हवी….