शंभूराजांचे राजनीती शास्त्र उलगडणाऱ्या “विद्यार्थ्यांचे शंभूराजे” चे बुधवारी प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी 

पुणे : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजनीती शास्त्रावर आधारित चरित्र अभ्यासक व लेखक निलेश रमेश भिसे यांनी लिहिलेल्या “विद्यार्थ्यांचे शंभूराजे” या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा बुधवार दि. १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता गणेश सभागृह न्यु इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे येथे होणार आहे.

“विद्यार्थ्यांचे शंभूराजे” या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा उरी सर्जिकल स्ट्राईकचे जनक निवृत्त लेफ्ट. जनरल राजेंद्र निभोंरकर यांच्या हस्ते होणार आहे, तसेच माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली तुषार दामगुडे, शिरिष महाराज मोरे, रविंद्र घाटपांडे उपस्थित होणार आहे अशी माहिती लेखक व अभ्यासक निलेश भिसे यांनी दिली आहे.

लेखक भिसे म्हणाले शंभूराजांबद्दल विद्यार्थी आणि युवा पिढीमध्ये प्रचंड आकर्षण आहे शंभूराजांनी केलेला उपदेश युवा पिढी नक्की ऐकते, शंभूराजांनी बुधभूषण या ग्रंथांमध्ये राजनीती शास्त्रावर मार्गदर्शन केले आहे पण ते आजच्या काळात सर्वांसाठी उपयुक्त हाच विषय “विद्यार्थ्यांचे शंभूराजे” या ग्रंथात मांडला आहे.

शिरीष महाराज मोरे म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये शंभूराजे चरित्राचा प्रसार व्हावा तसेच अस्सल शंभू चरित्र लोकांसमोर जावे म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत त्या त्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे शंभूराजांच्या व्यक्तिमत्वातील एक वेगळा पैलू या पुस्तकातून लेखक निलेश भिसे यांनी मांडला आहे.