युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दोन युवकांच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना खल्लार नजिकच्या मलकापूर(धाबे)येथे घडली असून याप्रकरणी मृतक बहिणीच्या फिर्यादीवरुन खल्लार पोलिसांत दोन युवकांविरुध्द गुन्हा दाखल केली.तक्रारीला अनुसरून गुन्हा दाखल होताच दोन आरोपींना अटक करण्यात आली.
खल्लार पोलिस स्टेशन पासून एक किमी अंतरावर असलेल्या मलकापूर(धाबे)येथील कु प्रतिक्षा नंदकिशोर मोहोड या युवतीला आरोपी नंदकिशोर मोहोड रा मलकापूर(धाबे),वैभव कैलास गुडधे रा.नायगाव ता. अचलपूर हे दोन युवक नेहमीच त्रास देत होते.
त्यांचा त्रासाला कंटाळून प्रतिक्षा मोहोड हिने दि 28 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता विष प्राशन केले होते.लगेच तिला उपचारार्थ चंद्रपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले,प्रकृती गंभीर असल्याने तिला उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर हलविण्यात आले होते.
उपजिल्हारुग्णालयातील डॉक्टरांनीही तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रकृती चिंताजनक असतांनाच 3 मे रोजी युवती मृत पावली.
दोन युवकांच्या त्रासामुळे प्रतिक्षा हिने विष प्राशन करुन आत्महत्या केली अशी फिर्याद मृतकाच्या 16 वर्षीय बहिणीने खल्लार पोलिसांत दिली असून त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी अनिकेत मुरलीधर मोहोड व वैभव कैलास गुडधे विरुध्द अप नं.114/23 कलम 306,34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
या घटनेचा पुढील तपास ठाणेदार चंद्रकला मेसरे करीत आहेत.