चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली तालुका शारिरीक शिक्षण महासंघाच्या वतीने नुकतेच उमरी येथील नम्रता विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयातून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अरविंद पुस्तोडे यांचा साकोली येथे शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती अरविंद पुस्तोडे, त्यांच्या धर्मपत्नी वनिता पुस्तोडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी से.नि. शिक्षक भरत कावळे होते. प्रमुख अतिथी क्रीडा संघटक मार्गदर्शक शाहेद कुरैशी,से.नि.शि. मुरलीधर घोरमारे, साकोली तालुका संयोजक तुषार मेश्राम, लाखांदूर तालुका संयोजक प्रभू नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी क्रीडा मार्गदर्शक कुरेशी यांनी सांगितले की पुस्तके सर शारीरिक शिक्षक ते मुख्याध्यापक प्राचार्य पदापर्यंत कार्य करताना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शारीरिक शिक्षक महासंघ या संघटनांशी नेहमी जुळलेले राहिले आणि शिक्षकांच्या विविध समस्या दूर करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली व त्यांच्या पुढील
सुखमय आयुष्यासाठी अभिनंदन केले. अरविंद पुस्तोडे यांनी देखील या सत्काराला यथोचित उत्तर देवून शिक्षकांनी समर्पण भावनेने काम करावे व मला शारीरिक शिक्षक म्हणून काम करताना खूप आनंद झाला, मुख्याध्यापक असतानाही मी विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करत होतो असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन क्रीडाशिक्षक बाळकृष्ण दोनोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शा.शि. दुधराम कापगते, आर.डब्लू. कापगते, दानी, सुरकर, राठोड, भेंडारकर, सुनिल तवाडे, बडवाईक सर्व व शा. शिक्षकांनी सहकार्य केले.