दिनेश कुऱ्हाडे
प्रतीनिधी
पुणे ; शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी मिटकाॅन कन्सल्टंन्सी आणि इंजिनियरिंग सर्विसेस पुणे आणि महोगणी विश्व अॅग्रो प्रा.लि.यांनी संयुक्त उपक्रम द्वारे महागली वनशेती संकल्पना आणली असून शेतकऱ्यांना महागणी वनशेतीसाठी करून सन्मान सेवा आणि मार्ग मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजीनियरिंग सर्विसिंग पुणे ते मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद जोशी, मिटकॉन कार्बनचे क्रेडिट धवल मरगडे यांनी शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड पुणे आणि महोगनी विश्व अग्रो प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमातून मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक कार्बन मुक्त पर्यावरणाच्या दिशेने मिटकॉनचे हे पाऊल आहे, मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड च्या प्रथम उपक्रम द्वारे महोगनी वनशेतीद्वारे व्यावसायिक तत्वावर करार पद्धतीने वृक्ष लागवड करुन व्यावसायिक वनशेती संकल्पना राबवत आहे. या उपक्रमांतर्गत ५००० शेतकऱ्यांच्या सहभागातून सुमारे ६००० एकरी महोगनी वनशेतीची लागवड करण्यात आली आहे असे हर्षद जोशी यांनी सांगितले आहे.
मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड च्या ध्येयानुसार कृषी क्षेत्रात व कृषी संदर्भातील विविध व्यवसायातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.
मिश्र प्रजाती वृक्षारोपण, जैव इंधन बायोचार हे आगामी प्रकल्प आहे, मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड चे संचालक आनंद चलवदे म्हणाले की मिटकॉन आपल्या स्थापनेपासून हवामान बदल / शाश्वत विकास ध्येय क्षेत्रात व नुतनीकरणक्षम उर्जा, कार्बनचे प्रमाण कमी करणे, जैव इंधन, उर्जा कार्यक्षमता इत्यादी क्षेत्रात अग्रेसर आहे.
ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या शेतकरी व शेतीच्या शाश्वत विकास स्वस्थ पर्यावरणासाठी, लोकसहभागातून मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड कार्यरत राहील असे व्यवस्थापकीय संचालक भगतसिंग शेळके यांनी सांगितले.