ऋषी सहारे
संपादक
आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वैरागड येते अवैध दारू विक्रिचा महापूर चालू असून बीट जमादार व पोलीस प्रशासन सुस्त असल्याने दारू विक्रेते मस्त असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.
वैरागड हे शिक्षणाचे माहेरघर असून पांच क्रोशित प्रसिद्ध असे तीर्थ स्थळ आहे.पण इथ मोठ्या बिल्डिंग वाले व वैरागडला बदनाम करणारे दारू विक्रेते असल्याने येथील पवित्र स्थळ नेस्तानाभुत झाले असल्याचे बोलले जात आहे,
येथील बाहेरून आलेला व्यक्ती वैरागडला बदनाम करीत असून दारूचा मोठा व्यवसाय काहीजण करतात व स्वतःला मोठा उद्योगपती समजतात असे पुढे आले आहे.
तसेच माझा खिशात आमदार,खासदार आहेत तर माझा कोण वाकड करतो?अशा आविर्भावात सदर व्यक्ती बोलतो आहे. त्यामुळं बीट जमादार व ठाणेदार त्याच्या घराची झडती घेत नाही काय?
असे समजायचे का?की तो व्यक्ती कायद्या पेक्षा मोठा आहे.दुसरे असे की पैसा वाटतो व तोंड बंद करतो असे समजायचे काय?तो व्यक्ती जिल्ह्यातील पत्रकारांना जाहिरात देत असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणीच बातमी प्रकाशित करीत नसल्याची लोकचर्चेतील माहिती आहे.
म्हणून त्याची ओली पण जळते व वाळली पण जळते.
त्यामुळे अशा उर्मट व वैरागड बदनाम करणाऱ्या व्यक्तीला तडीपार करून मोठी कारवाई करण्याची मागणी जनमानसाकडून होत आहे.