राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथे दिनांक ०३/०४/२०२४ रोज बुधवारला पदवीदान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये संस्कार पब्लिक स्कूल च्या.के जी.२ वर्गातील विद्यार्थी उत्तीर्ण होवून पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेतला अशा विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने व संस्कार पब्लिक स्कूलच्या वतीने बालकरूपी विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात स्वागत व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पदवीदान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कार पब्लिक स्कूलचे प्राचार्य देवेंद्रजी फाये प्रमुख पाहुणे संस्था सचिव दोषहरजl फाये संस्थेचे सहसचिव प्रा.नागेश्वर फाये कुरखेड्यातील ज्येष्ठ नागरिक श्री. महमूद अहमद शेख, गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य चांगदेव फाये पालक नासिरभाऊ हाशमी ,रीना डी.पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कुकडे , पालक रोशनी चौव्हाण तसेच पालक, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका रुपाली गायकवाड तसेच आभार नेहा वालदे यांनी केले.तसेच पदवीदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षा दरवडे आणि देशमुख शिक्षीका यांनी विशेष सहकार्य केले.