राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधि
कूरखेडा :- गावाकडे परत येताना रस्त्यावरील पळसगांव शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात शौचक्रीये करीता थांबलेल्या इसमाचा पाण्यात बूडून मृत्यु झाल्याची घटना आज शूक्रवार रोजी सकाळी ८ वाजेचा सूमारास उघडकीस आली. मृतकाला फीटचा आजार असल्याने फीट येत पाण्यात पडत त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे.
तालूक्यातील चिनेगांव येथील मृतक जयंत जीवन उईके (४३) हे काल गूरूवार रोजी सायकलने स्वगाव चिनेगांव येथून कढोली येथे काही खाजगी कामाने गेले होते.
मात्र रात्र होऊनही ते परत न आल्याने कूटूंबियानी त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही. आज सकाळी पून्हा शोध मोहीम राबविली. यावेळी मृतकाची सायकल पळसगाव शेतशिवारातील शेततळ्याजवळ उभी होती. यावरून संशय बळावल्याने शेततळ्यात पाहणी केल्यावर त्यांचा मृतदेह गूडघ्याभर पाण्यात आढळून आला.
मृतकाला फीट( मीरगी) हा आजार असल्याने शौचक्रीये नंतर स्वच्छता करताना फीटचा झटका येत ते पाण्यात पडत बूडाले असावे असा अंदाज आहे.
घटनेची माहीती मीळताच कूरखेडा पोलीसांनी घटणास्थळ गाठत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालयात आणले.
घटनेचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे हवालदार शेखलाल मडावी करीत आहे.