उमेश कांबळे ता प्र भद्रावती –
स्वच्छोत्सवास महाराष्ट्र राज्यातील १२ स्वच्छता दूताची निवड करण्यात आली . यामध्ये भद्रावती येथील समता महिला बचत गटाचे अध्यक्ष रूक्साना शेख यांची या१२ दूता मध्ये निवड करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन नागरी अंतर्गत साजरा करण्यात आलेला स्वच्छोत्सवास महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूताचा सहभाग असून अन्य राज्यातील ३०० स्वच्छता दूत महिला सहभागी झाल्या होत्या. दिल्ली येथील हॅवीटर सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा उपक्रम आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून राबविण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, सचिन जोशी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशभरातील निवडक बचत गटातील प्रतिनिधी महिला स्वच्छता दूत या कार्यक्रमात उपस्थित होत्या या कार्यक्रमात भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील रुकसाना शेख यांनी ओला व सुका कचरा वेगवेगळे करून त्यामधून कंपोस्ट खत, गांडूळ खत, वर्मी खत तयार करून त्याची बाजारात विक्री करत असल्याबाबतची माहिती दिली. या स्वच्छता दूतामध्ये नागपूर महानगरपालिका, उमरेड, परभणी, अकोला, भुसावळ, जालना , मालेगाव सह नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्राच्या स्वच्छता दूतांचा दिल्ली येथे सत्कार करण्यात आला भद्रावती येथे रुकसाना शेख यांची स्वच्छता दूत निवडीकरिता नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विशाखा शेळके, नगरपरिषद कर्मचारी स्वच्छता विभाग यांचे सहकार्य लाभले.