युवराज डोंगरे
अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सातरगाव येथे मांजरी म्हसला केंद्राची शिक्षण परिषद व सत्कार तथा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोलाभाऊ बोबडे अध्यक्ष शा.व्य.समिती सातरगाव हे होते तर अतिथी म्हणून सौ मोनिकाताई काकडे सरपंच सातरगाव, .सौ.सपनाताई चवरे उपाध्यक्षा शा.व्य.समिती,सौ. कल्पनाताई वानखेडे केंद्रप्रमुख मांजरी म्हसला, सौ. कल्पनाताई पोपळघाटे सदस्या शा.व्य.समिती,सौ.पल्लवीताई वाकोडे सदस्या शा.व्य.समिती,राजेशभाऊ डोनारकर सदस्य शा.व्य.समिती, सुरेद्रभाऊ लोणारे पोलिस पाटील सातरगाव, तसेच तंज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षण परिषद करिता प्रविण गुल्हाणे ,अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नेवारे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र काळे यांनी केले.
या शानदार कार्यक्रमामध्ये सौ.अनिताताई दि.कापडे उच्चश्रेणी मुख्याध्यापिका जि.प.शाळा सातरगाव आणि .दिगंबरजी कापडे सेवानिवृत्त वैद्य.अधिकरी उभयतांचा यथोचित ग्रामस्थ व शाळाव्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांचे यातफे सत्कार करण्यात आला. त्यानंतरत्यांचे विद्यार्थ्यांनी शुद्धा त्यांनी निरोप समरंभा निमित्त छोटीसी भेट दिली. त्यानंतर मांजरी म्हासला केंद्रातील जिल्हा परिषद शाळा मोखड यांनी सन्मान प्रेरणेचा सन्मान गुणवत्तेचा य या उपक्रमाअंतर्गत नांदगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकाविल्या बद्दल मोखड शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण पाटील व त्यांचे सहकारी श्री.कमलाकर कदम संदीप झाडे आणि धनाजी चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमामध्ये मा.श्री.सुरज मंडे शिक्षक यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. केद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय कल्पणाताई वानखडे, ह्या केंद्राचा उत्कृष्ट रित्या सांभाळत असल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला मा.कल्पनाताई वानखडे यांनी मार्गदर्शन केले.
निरोप समारंभा निमित्त आदरणीय अनीताताई कापडे यांनी आपले भावूक मनोगत व्यक्त केले. त्यांची सेवेची सुरावात जी.प.शाळा कणी येथून प.स. नांदगाव मधून आणि सेवेचा शेवटही प स.नांदगाव येथे झाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
सत्कार समारंभ बद्दल आदरणीय किरण पाटील आणि सूरज मंडे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर प्रवीण गुल्हाणे सर यांनी आपले विज्ञान प्रयोग सादर केले. त्यानंतर स्वरूची भोज आटोपल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमा करिता संजय नेवरे, जयश्री पांडे, राजेंद्र काळे, उमेश ठाकरे, अनिल देशमुख, रवी गजभिये, प्रशांत सापाने आणि केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित राहून त्यांनी अथक परिश्रम घेतले.