अहेरी नगर पंचायातच्या प्रभारी मुख्यधिकाऱ्याची नगराध्यक्षासह असभ्य वर्तवणूक, पोलीसात तक्रार दाखल.. – जातीवाचक शिवीगाळ केल्याचा नगराध्यक्षाचा आरोप..

 डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

अहेरी नगरपंचायत येथील प्रभारी मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांनी नगराध्यक्षा कु.रोजा शंकर करपेत यांच्या कक्षात जाऊन असभ्य वरवणूक करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी नगराध्यक्षा कु.रोजा शंकर करपेत यांनी अहेरी पोलीस ठाण्यात प्रभारी मुख्यधिकारी विरुद्ध अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.मुख्याधिकारी खोत यांनी कशात प्रवेश करून सर्व अधिकार माझाकदे आहेत, कोणतेही काम असो माझा कशात येऊन मांडावे,निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार मुख्यधिकारी कडे असतो,नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती हे पद नाममात्र असतात, तुमचे काम सभेत येणे बसने चहा पिणे हेच आहेत, सर्व अधिकार शासनाने मला दिले आहेत, माझ्याकडे मोठी संपत्ती आहे असे बोलले असा आरोप नगराध्यक्षा यांनी केला असून खोत एवढ्यावरच न थांबता जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही नगराध्यक्षा यांचे म्हणणे आहे.दरम्यान नगराध्यक्षा यांनी समाजाबद्दल असे शिविगाळ करणे योग्य नाही म्हटले असता मुख्यधिकारी यांनी आणखी राबाबत येत तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही असे प्रतिउत्तर दिले.अशाप्रकारच्या वर्तवणुकीने मी भयभीत झाले असून यापूर्वीचे मुख्यधिकारी सर्वांना चांगली वागणूक देत होते मात्र खोत यांच्याकडे प्रभार आल्यापासून नगर पंचयाच्या एकही पदाधिकारी,सदस्य यांच्याशी चांगले वागले नाही.मात्र आता तर ती सीमा पार करत आदिवासी महिला तसेच अहेरी नगर पंचायत प्रथम नागरिकेला जाणूनबूजून द्वेष भावनेने माझा व माझ्या समाजाचा अपमान केल्याने प्रभारी मुख्यधिकारी यांच्यावर अँट्रासिटी तसेच इतर कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी केली आहे.सदर गंभीर प्रकरणबाबत काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे..!!

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,बालकल्यान सभापती मीनाताई ओंडरे,बाधकाम सभापती नौरास शेख,नगरसेविका ज्योती सडमेक,नगरसेवक विलास सिडाम,नगरसेवक विलास गलबाले,नगरसेविका सौ.सुरेखा गोडसेलवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नरेश गर्गम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते..!!