
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथील प्रेरणा मैत्री ग्रुपच्या वतीने दिनांक ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सवचे आयोजन शेतकरी भवन येथे करण्यात आले आहे. कला, नृत्य व क्रीडा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
प्रेरणा मैत्री ग्रुप महिलांमधील सुप्त गुणांसाठी मंच मिळून वाव मिळावा यासाठी कार्यक्रम घेत असून यंदाही दिनांक ८ मार्च शनिवार ला सकाळी ११वा कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. सकाळी ११ ते १२वा पर्यत विविध खेळ, दुपारी १२ ते १ वा पर्यत कॅट वाक स्पर्धा तर दुपारी १ ते ४ वा. पर्यत एकल नृत्य, समूह नृत्य, युगल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे.
महिला स्पर्धेकांनी आयोजकांकडे नावे नोंदवावी व महिलांनी उपस्थित राहण्याचे असे आवाहन सौ.भावना भोपे, सौ.नितु पोहनकर, सौ.नम्रता राचलवार, सौ.अर्चना भोपे, सौ.जयश्री दानव, सौ.कविता वरघणे, सौ.अर्चना लोथे, सौ.शिल्पा अढाल, सौ.गायत्री झुरमुरे, श्रीमती उमा जाधव, सौ.धनश्री बिरजे, सौ.संध्या चलपे, सौ.राधा पुराणिक, सौ.वैशाली लखमापुरे यांनी केले आहे.