
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून नुकतेच अमरावती येथे इर्विन चौकात जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात आले.
दर्यापुरात सुद्धा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक दि.7 मार्चला कृषी भवन, येथे दुपारी एक वाजता आयोजित केल्याची माहिती दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी दिली असून या बैठकीला अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे तसेच अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामिणचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ देशमुख हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दर्यापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन सुद्धा दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे व शहर काँग्रेस अध्यक्ष आतिश शिरभाते यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.