प्रशांत कोरटकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, शिवसेना (उबाठा)चे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात दर्यापूर ठाणेदार यांना निवेदन… 

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

           आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या, तसेच कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणात प्रशांत कोरटकरचा अद्यापही पोलिसांना शोध लागलेला नाही.

           प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीला महापुरुषांची बदनामी, सामाजिक तेढ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी तातडीने अटक करावी अशी मागणी करणारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांना निवेदन देऊन त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून महाराष्ट्र मधून हाकलून द्यावे अशी मागणी करण्यात आली.

          महाराष्ट्र मध्ये राहून जर आमच्या दैवताला कोणी काहीही बोलत असेल व मुख्यमंत्रीच्या राज्यात आहात अशी धमकी देत असेल तर हे गंभीर स्वरूपाचे असून यावर तात्काळ गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर लक्ष दिले पाहिजे व हे रयतेचे राज्य आहे की त्याच्या म्हणण्यानुसार व्यक्ती विशेष राज्य आहे हे समजण्या पलीकडे आहे म्हणून अशा नालायक माणसाला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली.

          निवेदन देते वेळी अंकुश पाटील कावडकर युवासेना जिल्हाप्रमुख, सौ.अलका निलेश पारडे जिल्हाप्रमुख महिला आघाडी अमरावती, बबनराव विल्हेकर विधानसभा संघटक, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिरहे, युवासेना विधानसभा समन्वयक पंकज राणे, सरपंच मोहन बायस्कर, सरपंच किशोर टाले, नंदू पाटील पखाले, भरत हिंगणीकर, धनंजय पवार, दीपक बगाडे, शरद आठवले, शुभम विल्हेकर, राज गुजराती, रामसिंग साळुंखे, सुनिता ताई मंडवे, निलेश पारडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.