दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी देवाची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बाबुलाल घुंडरे पा. यांची निवड करण्यात आली. तर, व्हाइस चेअरमन पदी सुभाष सोनवणे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन दिलीप मुंगसे व व्हाॅ.चेअरमन अनिता घुंडरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी निवडणुक अधिकारी बगाटे मॅडम, सचिव सचिन कुऱ्हाडे, बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, माजी उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, माजी चेअरमन दिलीप मुंगसे, ज्ञानेश्वर घुंडरे, नितीन घुंडरे, वासुदेव मुंगसे, हनुमंत घुंडरे, अनिता घुंडरे, सिंधूबाई कुऱ्हाडे, संदीप नाईकरे, संतोष वीरकर, जनार्दन घुंडरे, दत्तात्रय कुऱ्हाडे, सुरेश घुंडरे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांकडून नवनिर्वाचित चेअरमन घुंडरे व व्हाईस चेअरमन सोनवणे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आळंदी देवाची सोसायटीचे कार्यक्षेत्र आळंदी व केळगाव गावांचे असून सर्व शेतकरी बांधवांना शेती कर्ज,खत,शेती अवजारे व पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणार असे नवनिर्वाचित चेअरमन घुंडरे यांनी सांगितले.