युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोली शिंगणे येथे जुगार प्रकरणी एकास अटक केली असून त्याच्यावर खल्लार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचोली शिंगणे येथील गजानन तुळशीराम खंडारे(५४) हा त्याच्या घरासमोरील पानठेल्याच्या आडोश्याला ५२ तास पत्यावर पैश्याची बाजी लाऊन हारजीतचा जुगार खेळतांना आढळून आला त्याच्या ताब्यातून ५८० रुपये रोख व इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्यावर अप न६२/23कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.