क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे स्त्री शिक्षणाचे आराध्य दैवत, भारतातील प्रथम शिक्षिका, मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमय करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. 

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. डोये तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. बी.पी.बोरकर, प्रा. स्वाती गहाणे , प्रा. के.जी. लोथे ,आर बी कापगते ,डी एस बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

     कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

     याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी एस बोरकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले सावित्रीबाई फुले हे स्त्री स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला. जिथे महिलांना केवळ सन्मान नाही तर जीवन जगण्याच्या नवा मार्ग मिळाला ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाले आहेत, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे असे मार्मिक विचार व्यक्त करण्यात आले.

     याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांची वेशभूषा केली होती तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविधांगी भाषणे, गीत सादर केले. 

      कार्यक्रमाचे संचालन आर व्ही.दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका स्वाती गहाणे यांनी केले. 

    कार्यक्रमाचे यशस्वीते करिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.