सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        साकोली – सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या.

           त्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे कुंदा जांभुळकर, रहिला कोचे, आशा बडवाईक, मनोजभाऊ कोटांगले, कार्तिक मेश्राम,कैलाश जांभूळकर , एकनाथ कोटांगले, प्रा.जनार्धन मेश्राम, रुपेश कोटांगले, सुबोधकांत कोटांगले, मारोती जांभुळकर, बळीराम कोचे, चरणदास कोचे, गुलाब कोटांगले, मोहिनी कोटांगले, आशावर्कर कृपा भैसारे, ज्योती तरोणे, प्रमिला पोवळे, फुलन कोटांगले,पुष्पा मेश्राम, कौशल्या कोटांगले, माधुरी जांभुळकर, नामदेव सोनटक्के, नामदेव भुरे, उपस्थित होते.