कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. — भिसी येथील घटना..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादिका 

                तालुक्यातील भिसी येथील वसंता विजय लोहकरे वय ३५ वर्षे या शेतकऱ्यांने खाजगी बॅंक व सावकारांकडून शेती च्या खर्चाकरिता लाखो रूपयाचे कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी अतीवृष्टी व पिकांवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पन्न कमी व खर्च मोठ्या प़माणात झाल्याने मृतक शेतकरी चिंतेत होता. यामुळे वसंता विजय लोहकरे याने मागील आठवड्यात बुधवार ला सायंकाळी ५ वाजताचे सुमारास भिसी शहरालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात विषारी औषध प़ाषण केले होते. त्याची प़कृती गंभीर असल्याने त्याचेवर पहिल्यांदा भिसी, उमरेड व नंतर नागपुर येथे वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवार च्या पहाटे वसंता विजय लोहकरे याची उपचारादरम्यान प़ाण ज्योत मालविली. 

    मृतकाचे पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास भिसी चे ठाणेदार प़काश राऊत यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.