
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर..
चंद्रपूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा (यांत्रिकी विभाग ) अंतर्गत ७० ट्रायसेम हातपंप कर्मचारी हातपंप दुरुस्तीचे काम सन १९८६ पासून करीत असताना राज्यातील इतर जिल्ह्यात शासनाच्या जिआर नुसार शासकीय सेवेत सामावून घेतले असताना चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. ट्रायसेम हातपंप कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी महाराष्ट्र हातपंप यांत्रिकी कर्मचारी संघटना नाशिक शाखा चंद्रपूर अध्यक्ष मुकेश दुर्गपाल यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हातपंप यांत्रिकी कर्मचारी हातपंप दुरुस्ती चे काम सन १९८६ पासून करीत असून त्यांना जिप तटपूजे वेतन देऊन कामे करून घेत आहे.जिल्ह्यातील पाणी पुरवठा योग्य रीतीने पार पाडत असताना शासकीय सेवेत सामावून न घेता जिप प्रशासन अन्याय करीत आहे.
हातपंप यांत्रिकी कर्मचारी यांना शासकीय सेवेत करण्यासाठी अद्यादेश काढून अंमलबजावणी करण्यात आली असून इतर जिल्हा परिषद प्रशासन ने शासकीय सेवेत सामावून घेतले. नुकतेच १७ जानेवारी २५ ला पालघर जिप यांनी शासकीय सेवेत सामावून घेतले. परंतु चंद्रपूर जिप मात्र कानाडोळा करून दुर्लक्ष करीत आहे.
हातपंप यांत्रिकी कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष मुकेश दुर्गपाल यांनी शासनाशी वेळो वेळी पत्रव्यवहार केला. परंतु दुर्लक्ष होत आहे. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची भेट घेऊन निवेदन देत शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शब्द दिले.
चंद्रपूर जिल्हातील हातपंप दुरुस्ती कर्मचारी यांना जिल्हा परिषद यांनी आस्थापनेवर घेऊन तसें त्यांना आदेश तात्काळ दयावे अन्यथा नाईलाजाने न्यायालयीन लढा तसेच संपूर्ण जिल्हातील हातपंप दुरुस्तीचे कामे मार्च २०२५ पासून सर्व कर्मचारी करणार नाही तसेच उपोषणास बसणार असल्याचा इशारा संघटनेचे वतीने देण्यात आला.