
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
सासन बु येथील रहिवाशी अमोल प्रल्हाद पडघामोल हे दि 25/1/25 रोजी ग्रा प सासन या ठिकाणी उपोषणाला बसले होते.
त्यांच्या प्रमुख मागण्या सदर ग्रामपंचायत रेकॉर्डला खाते दाराच्या नावे खोडतोड करून खातेदाराच्या नावे जागा वाढवली व सासन बुद्रुक येथील रहिवासी अमोल कोरडे या व्यक्तीने शेतीच्या रस्त्यावर बांधकाम करून रस्ता बंद केला ग्रामपंचायत ने कोणतीही परवानगी घेतली नाही.
सदर उपोषण करते या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून गोठा बांधकाम पूर्ण केले परंतु अध्याप पर्यंत पं स कडून पैसे मिळाले नाही या सर्व मागणीसह अमोल पडघामोल उपोषणाला बसला होता.
अखेर पं स विस्तार अधिकारी मिलिंद ठुणुकले यांनी उपोषणकर्त्याची समजूत काढून उपोषण मांगे घेण्यात यश आले व त्यांनी लेखी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने चौकशी समितीचे गठन करण्यात आले.
त्या समितीमध्ये चौकशी प्रमुख सी जे ढवक सहा.ग.वि.अ, सुरेश रामागडे कृषी अधिकारी मिलिंद ठुणुकले, प्रदीप भटकर,शपंकज नागे, अभिजीत काळे हे कर्मचारी व अधिकारी चौकशी समिती नेमली व दि12/2/25 पूर्वी उपोषणकर्त्याचे प्रकरण निकाली काढू असे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती दर्यापूर यांनी दिले.