भारतीय किसान संघाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत जिल्हा भंडारा व साकोली तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायब तहसीलदार एस.सी. शेंडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

          यात कर्जमाफी, शेतीपंपासाठी 24 तास वीज मिळावी, धानाचे उर्वरित चुकारे मिळावेत ,धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा, गोसीखुर्द धरणाचे पाणी साकोली तालुक्याला देण्याची व्यवस्था करावी, मका खरेदीची व्यवस्था करण्यात यावी इत्यादी मागण्या घेऊन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनात हे निवेदन देण्यात आले.

         यावेळी जिल्हा मंत्री दिनेश कापगते कोषाध्यक्ष मधुकर कापगते , इंद्रायणी कापगते, जिल्हा सहमंत्री ऋग्वेद येवले, तालुका मंत्री सुनील टंडन,रेखा समरीत, मिलींद कापगते, अरुण झोडे , मुकेश बावणे, ऋषी येरणे , दिलीप कापगते, युगल झोडे, राजकुमार कापगते , जगदीश गिरहेपुंजे, सुखदेव गिरहेपूंजे, योगराज बोरकर, माणिक बडवाईक , लीलाधर मंवटकर, जयराम गहाने, तुळशीदास लांजेवार, संजय कापगते, ऋषी येरने, मोतीराम लंजे, गंगाधर आवरकर, राकेश कापगते , अरुण झोडे, शुभम समरित, किशोर संग्रामे, इत्यादी किसान संघाचे सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.