नवनिर्वाचित तालूका प्रमुखांचा परिवर्तन पॅनलच्या वतीने सत्कार…

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक 

          चंडिकापूर ग्राम पंचायतचे उपसरपंच तथा शिवसेना (उबाठा) निष्ठावान कार्यकर्ते प्रमोद धनोकार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने दर्यापूर तालूका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

          त्यांच्या नियुक्तीमुळे दर्यापूर तालूक्यात उत्साहाचे वातावरण आहे. प्रमोद धनोकार सारखे मनमिळावू व सामाजिक कार्यकर्ता असलेले व्यक्तिमत्व तालूका प्रमुख या पदाला पूर्ण न्याय देणारे आहे.

           याच अनुषंगाने तालूकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिघी जहानपूर येथील परिवर्तन पॅनलचे सर्वेसर्वा कैलास पाटील सगणे, गजानन सगणे, गौरव पाटील सगणे, पोलीस पाटील नितिन शिरस्कार आणि वडुरा ग्राम पंचायतचे सरपंच नितनवरे गुरूजी यांनी ग्राम पंचायत चंडिकापूर येथे जाऊन नवनिर्वाचित तालूका प्रमुख प्रमोद धनोकार यांचा शाल श्रीफल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.

       यावेळी जगदीश उंबरकर कांडलकर व गावकरी उपस्थित होते.