
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
दिनांक 5/02/2025 राज्य शासनाच्या निर्देशानुसार 5 फ़ेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्यात सर्व गावात महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते.जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रमदानात लोकांनी सहभाग नोंदवला.
महास्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी होवुन प्रत्येक गावात अभियान राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नुतन सावंत यांच्या मार्गदर्शना खाली चंद्रपुर जिल्ह्यातील गावा गावात श्रमदान मोहिममध्ये शेकडो नागरिक हातात झाडु घेवुन, स्वच्छतेसाठी पुढे आले.
गावा गावातील सार्वजनिक ठिकाणे या श्रमदान मोहीमे मधुन स्वच्छ करण्यात आले .या महाश्रमदान मोहीमेत गावक-यांसह अधिकारी,कर्मचारी,लोकप्रतीनिधी यांनी मोठ्यास्वरुपात सहभाग नोंदवला.
जिल्ह्यात ठिक ठिकाणी महास्वच्छता अभियानात चांगला सहभाग मिळाला असुन,चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात श्रमदान करुन,गावा गावतील शेकडो हातांनी परिसर स्वच्छ केला आहे.
या उपक्रमातुन एकाच दिवशी चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व गावातील विविध स्थळांची स्वच्छता करण्यात आली.या उपक्रमात चंद्रपुर जिल्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच गावस्तरावरील सर्व कर्मचारी यांनी सहभागी होवुन,गावस्तरावर उपक्रम यशस्वी केला.
चंद्रपुर जिल्ह्यात महास्वच्छता अभियानात मोठ्या स्वरुपात गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविता आले.यातुन जिल्ह्यातील गावा गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करता आला.