
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी अधिकारी…
चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे अनेक वर्षापासून अतिक्रमण धारक वास्तव्य करीत आहेत.त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल बांधकाम परवानगी मिळण्याची मागणी उपसरपंच राजेंद्र साठोनणे यांनी अतिरिक्त जिल्हाधीकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जांभुळघाट येथील सर्व्हे क्र. ४६ मध्ये मागिल २० वर्षा पासून अतिक्रमण धारक झोपडी बांधून वास्तव्य करीत आहे.वास्तव्य करीत असलेल्या जागेचा ग्रामपंचायत कडून पाणी,रस्ते, वीज सुविधा मिळत आहे आणि ग्रामपंचायत कर वसूल करीत आहे.
सदर जागेवर काही अतिक्रमण धारक यांना घरकुल मंजूर झाले आहे.परंतु ग्रामपंचायत नमुना -८ वर भोगवटदार म्हणून ग्रामपंचायतची नोंद आहे.त्यामुळे शासनाच्या घरकुल योजने पासून वंचित रहावे लागत आहे.
शासनाच्या निर्णयानुसार अतिक्रमण जागा नियमाकुल करण्यासाठी दिनांक २८ जून २३ च्या ग्रामसभेत ठराव क्र. ३ नुसार ठराव मंजूर करण्यात आला. त्या ठरावाची प्रत दिनांक ८फेब्रुवारी २४ला दिल्या नंतर ही कोणतीही कारवाई केली नाही.एक वर्ष होऊन ही दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे शासकीय योजने पासून वंचित राहत आहे.
जांभुळघाट येथील अतिक्रमण नियमाकुल करून घरकुल बांधकाम परवानगी मिळण्याची मागणी उपसरपंच राजेंद्र साठोणे यांनी केली असून अतिरिक्त जिल्हाधिकारी,तहसीलदार,सवर्ग विकास अधिकारी पस चिमूर यांना दिलेल्या निवेदन मधून केली असून निवेदन देत असतांना ग्रामपंचायत सदस्य उमाजी निवटे,अमोल गजभिये व अतिक्रमणधारक उपस्थित होते.