
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
वरोरा तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) आणि चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथे स्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे.
स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून गावातील प्रत्येक परिसर स्वच्छ करण्याला आणि ठेवण्याला मौजा कोटगाव आणि मौजा सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील नागरिकांनी महत्व दिले आहे.
मौजा सावरी (बिडकर) येथील सरपंच श्री.लोकनाथ रामटेके,सदस्य श्री.रामदास खामनकर,समाजसेवक श्री. बुध्दरत्न शेंडे,ग्रामविकास अधिकारी आणि गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रामस्वच्छता केली.
यापुढे सुध्दा गावस्वच्छतेला महत्व देणार असल्याचे सरपंच श्री.लोकनाथ सरपंच यांनी सांगितले आहे.
याचबरोबर चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथे ग्राम स्वच्छता मोठ्या उत्साहात करण्यात आली.
ग्रामस्वच्छता करतांना सरपंच सौ.मुक्ताताई गिरिधर कापसे,उपसरपंच श्री.धारणे,ग्रामपंचायत सदस्य उपक्षम रामटेके,श्रिमती वनीता घोडमारे, पोलिस पाटील विनोद राऊत,ग्रामसेवक संजय कोहपरे,आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यापूर्वी मौजा कोटगाव गटग्रामपंचायतने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्य मुर्ती गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्हा स्तरावरील क्रमांक पटकाविला आहे आणि शासनाच्या विविध उपक्रमातंर्गत इतर क्रमांक सुध्दा पटकावले आहे.
कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले नागरिक स्वयंस्फूर्तीने शासकीय उपक्रमात सहभागी होत असतात हे विशेष…