पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धांच्या अस्थिंचे आगमन आज… — नागपूर शहरातील उपासक -उपासिकांनी अस्थिचे दर्शन घ्यावे !भदंत हर्षबोधी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

नागपूर : रमाई जयंती अमरावतीत आयोजित केली आहे.त्या निमित्ताने दिल्ली वरून येत असलेली बुद्धांची अस्थि 6 फेब्रुवारीला नागपुरात दीक्षाभूमी येथे दुपारी ३ ते ६ या दरम्यान येत आहे,तसेच दीक्षाभूमी येथे ठेवण्यात येत आहे. 

         शहरातील उपासक-उपासिकांनी अस्थिच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माहिती महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत हर्षबोधी यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.

          या दर्शनासाठी शहरातील बौद्ध बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अस्थि दर्शनास यावे. असे आवाहन भदंत हर्षबोधी यांनी केले आहे. 

        या विषयाला धरून दीक्षाभूमी स्मारक समितीकडून अस्थि ठेवण्यासाठी अनुमती मिळाली आहे हे विशेष: …

      पत्रपरिषदेला उपस्थितीत भैय्यासाहेब खैरकर,संजय मून,भदंत चंद्रबोधी,भदंत एस राहुल,नरेश गायकवाड,अनिल कोंडमारे आदींची उपस्थिती होती.