
माणूस हा निसर्गाचा एक घटक आहे.आधी तो प्राणी आहे,आणि नंतर माणूस आहे,म्हणून माणसाला मनुष्यप्राणी असे म्हणतात.माणसाचे मूळ गुण प्राण्याचे आहेत,मग तो हिंस्र असेल की अहिंसक,पण आधी तो प्राणी आहे,याचा अर्थ प्राण्याची बुध्दी कमी असते.परंतु नंतर तो माणूस आहे,आणि म्हणून तो बुध्दिमान पण आहे.याचा अर्थ बुध्दीने तो कमी जास्त आहे,तरी माणसाचे वैशिष्ट्य हे की,त्याच्याकडे विवेक बुध्दी पण आहे,म्हणजेच सारासार बुध्दी पण आहे,याचा अर्थ चांगले काय ? वाईट काय ? योग्य अयोग्य,चुकीचे बरोबर ,शुद्ध अशुद्ध,पवित्र अपवित्र,खरे खोटे हे पण विवेकबुद्धी ने तो जाणू शकतो,पण तसे त्याच्या मनाची विचाराची तय्यारी पाहिजे.
माणसाला तन मन विचार विवेक हे चार गोष्टी सूक्ष्मपणे त्यात असतात.माणूस जसा विचार करतो,तसे त्याचे मन बनते,मन शरीरावर नियंत्रण ठेवते,याचा अर्थ माणसाचे मन जिकडे घेऊन जाईल तिकडे शरीर जाते.म्हणजेच शरीर,त्याचे अवयव मनाच्या ताब्यात असतात.जसा घोडा ,घोडेस्वार चे ताब्यात असतो तसा.
शरीरावर ताबा मनाचा,मनावर ताबा विचाराचा,विचारावर ताबा विवेकाचा,असा क्रम मानवी सूक्ष्म देहाचा असतो.पण याचा अभ्यास माणसाने करायचा असतो.मन मलिन असले की सारे काही बिघडते,म्हणून ” चित्त शुध्दी तर मन शुध्दी,आणि विचार शुध्दी तर मन शुध्दी,आणि मन शुध्दी तर शरीर शुध्दी होत असते.म्हणूनच संतांनी सांगितले की ” मन करारे प्रसन्न तेची सिद्दी चे साधन”. नको नको मना,गुंतू मायाजाळी , काळ आला जवळी ग्रासावया.” तरी माणूस मोह माया ,आपला तूपला,परका हा भेदभाव करतात.आपपर भावाने एकमेकाशी व्यवहार करता.प्रेमभाव ने व्यवहार करतात.एकमेकाशी व्यवहार करताना जात धर्म लिंग भाषा प्रांत हा भेद करून वागत असतात.आणि एकमेकांचे शारीरिक ,मालमत्ता,आणि आयुष्याचे कुटुंबाचे पण नुकसान करून घेत असतात.
प्रत्येकात सद्गुण आणि दुर्गुणांचा वास असतो,कमी अधिक प्रमाणात.अहंकार मान माया लोभ द्वेष कपट इत्यादी माणसाचे सहा शत्रू त्याचे नुकसान करण्यासाठी त्याचे आतच दडी मारून बसलेले असतात.संधी मिळताच ते त्याचे काम करतात.याच प्रमाणे प्रेम दया क्षमा शांती,सत्य न्याय निती,प्रज्ञा शील करुणा,स्वातंत्र्य समता बंधुभाव इत्यादी सद्गुण पण माणसात सूक्ष्म स्वरूपात असतात.या सद्गुण आणि दुर्गुणांचा अभ्यास आणि वापर करायचा की नाही करायचा ? हे प्रत्येकाने ठरवायचे असते,निश्चय करायचा असतो.जो व्यक्ती दुर्गुणांचा सहारा घेतो,किंवा वापर करतो,तो वाया जातो,आणि जो व्यक्ती सद्गुणांचा सहारा घेतो, वापर करतो ,तो हा भव सागर तरुण जातो, पार करतो.
धर्म” याचा अर्थ धारणा,विश्वास, श्रध्दा,किंवा मान्यता.अर्थात आपण कशावर विश्वास ठेवावा ,कशाला मान्यता द्यावी ? हे आपले हित आणि इतरांचेही हित कशात आहे ? याचा विचार आधी केला पाहिजे.विचाराचा संघर्ष जरूर असावा,पण तो संघर्ष सकारात्मक ,वैधानिक,कायद्यात बसणारा,माणुसकीचा असावा,तसा तो नसेल तर संघर्ष पेट घेतो,भडकतो,आणि त्याचे हिंसेत रूपांतर होते,युद्धात रूपांतर होते.आणि मनुष्य संहार घडून येतो.या संहारात दोन्ही पक्षाचे,बाजूचे मरून जातात.सारेच मरणार असतील तर मग धार्मिक दंगली,अनाचार,दुस्टकृत्या तरी का करायचे ? दया धर्मका मूल है,असे कबीर संत सांगतात,दया क्षमा शांती,तेथे देवाची वस्ती,असे पण सर्वानाच माहीत आहे.खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे,हे ही सारे जाणतात.मग एकमेकांचा आणि एकमेकांच्या धर्माचा द्वेष करून भांडणे का करतात ? काय गरज आहे ? भांडायची ? सर्व धर्मीय एकमेकांचा आदर करून,प्रेम करून गुण्यागोविंदाने नांदत्ता येते.तशी इच्छा पाहिजे.परंतु काही विघ्नसंतोषी लोक स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी,सत्ता संपती प्रतिष्ठा मिळवणे साठी अज्ञानी गोरगरिबांचा जीव घेतात,हे पापी लोक भयानक राक्षस होत.यांचे पासून सावध राहण्याची गरज आहे, कधी खलिस्तान,कधी हिंदुस्थान, कधी पाकिस्तान, कधी दलिस्थान तर कधी बोडोस्थान असे वाद पेटवून देशाचे अखंडत्व,ऐक्य,समाजिक एकता नष्ट करू पाहत आहेत.
खरे तर विचार केला तर असे दिसेल की,या जगातील सारी माणसे सारखीच आहेत,यात कुणी पक्षी जनवावर नाहीत,की दगड गोटे नाहीत,सारीच हडामासाने बनलेली सारखीच माणसे आहेत,त्यांचे वसतीस्थान ,प्रांत,भाषा,संस्कृती ,केशभूषा,वेशभूषा,रंग, हे त्या त्या प्रांतातील माती,पाणी हवामान यानुसार अलग अलग संस्कृती बनलेली आहे,म्हणून काय झाले ? पण शेवटी सारी माणसेच,आणि सारखीच आहेत ना ,? जनावरे तर नाहीत ना ? सारी माणसे एकाच मानव जातीची च आहेत ना ? जगी सर्व एक आहे,जात मानवाची. मग भेदभाव का करायचा ? असा विचार सर्वांनीच जर केला तर सत्ता संपती प्रतिष्ठेसाठी भांडणे लावणाऱ्या चे सारे मनसुबे धुळीस मिळतील.आणि सारे जग युद्ध सोडून बुध्द स्वीकारतील.विषमता सोडून समता प्रस्थापित करतील.हे नक्कीच घडेल,पण त्या आधी प्रत्येकाने आधी आपण आपले विचार तपासून घेतले पाहिजेत.तेंव्हा कळेल की आपण धर्म पंडित नसून,धर्म पडित आणि धर्मवेडे आहोत.आणि धर्म वेडे पणात भलतेच काही करीत आहोत.आपणच आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.आपण आपल्याच हाताने आपलाच आणि आपल्याच मनुष्य जातीचा गळा कापित आहोत.हे टाळण्यासाठी आपण जे धर्माच्या नावाने जे दुस्कृत्य कराल ते आधी तपासून पाहा.म्हणजे हा अनर्थ टळेल.कारण माणसाचे विचार मनाला आदेश देतात,आणि मन शरीराला आदेश देते,त्यानुसार कृत्य घडत असते.
माणसाचे आचरण शुद्ध ठेवण्यासाठी आधी मन,मनाच्या शुद्धीसाठी विचार तपासनी आवश्यक आहे.
विचार तपासल्या नंतर तुम्हाला नक्कीच आपण आपल्या धर्माच्या नव्हे तर चुकीच्या म्हणजे धर्माच्या वाटेने जात आहोत,हे लक्षात येईल.