खल्लार पोलिस स्टेशनमध्ये निरोप व स्वागत समारंभ…

युवराज डोंगरे खल्लार 

        उपसंपादक

          खल्लार पोलिस स्टेशनमध्ये निरोप व स्वागत समारंभाचा कार्यक्रम पोलिस स्टेशन सभागृहात दि 5 फेब्रुवारीला घेण्यात आला.

           खल्लार पोलिस स्टेशनच्या तत्कालीन ठाणेदार चंद्रकला मेसरे व दुय्यम ठाणेदार ठावरे यांचे स्थानांतर झाले त्याबद्दल त्यांचा निरोप व नवनियुक्त ठाणेदार मनोज सुरवाडे यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पोलिस स्टेशनचे कर्मचारी व पोलिस पाटील संघटनेने आयोजित केला होता.

              याप्रसंगी चंद्रकला मेसरे यांना खल्लार पोलिस स्टेशनमधिल सर्व कर्मचारी व पोलिस पाटील संघटनेतर्फे शाल, सन्मान चिन्ह देऊन निरोप देण्यात आला. तर नवनियुक्त ठाणेदार मनोज सुरवाडे यांचे पोलिस स्टेशनचे कर्मचारी, पोलिस पाटील संघटना व होमगार्ड यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन सन्मानित करण्यात आले.

             यावेळी खल्लार पोलिस स्टेशनमधिल सर्व कर्मचारी, खल्लारचे सरपंच आरिफ शहा, ग्रा पं चे सदस्य सलिम बेग,खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील, होमगार्ड उपस्थित होते.