प्राथमिक आरोग्य केंद्र रामतीर्थ यांना पडला वेळेचा विसर…  — रुग्णालयात वेळेवर एकही डॉक्टर व परिचारिका हजर नाहीत..

युवराज डोंगरे/खल्लार 

   उपसंपादक

      प्राथमिक आरोग्य केंद्र हे भारतातील आरोग्यसेवेच्या उतरंडीतील सर्वात खालचे एकक आहे.देशातील दूरवरच्या भागातील मनुष्यवस्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोहचविण्याच्या उद्देशाने भारतातील मध्यवर्ती सरकारच्या धोरणानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यात आले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि परिचालनाबाबतचे सर्व निर्णय..

         मात्र,राज्य सरकारांची आरोग्य खाती घेतात.प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते.

          जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार एक प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्यांना पडला वेळेचा विसर आज रोजी सकाळच्या ९ च्या सुमारास रामतीर्थ येथील प्राथमिक रुग्णालयात एकही डॉक्टर,कर्मचारी,नर्स,सफाई कामगार,यापैकी कोणीही हजर नव्हते.

          सरकारी रुग्णालया आहे म्हणून यांना वेळेवर यायचे नाही आहे का की यांना कोणी विचारणार नाही.अशातच नांदरून येथील सामाजिक कार्यकर्ते शिलवंत रायबोले रामतीर्थ येथील रुग्णालयात उपचार घेण्याकरिता गेले असता त्यांना रुग्णालयात कोणीही डॉक्टर हजर नसल्याचे निदर्शनास आले आजूबाजूला माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती देण्यासाठी पण कोणी रुग्णालयात हजर नव्हते रुग्णालय पूर्णपणे खाली होते.

            त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक राहिलेला नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे?

           कधीही यायचे रुग्णालय उघडायचे.या रुग्णालयातील कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात लवकरच लेखी स्वरूपात तक्रार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत,जिल्हाशल्य चिकित्सक अमरावती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना सादर करणार असल्याचे शिलवंत रायबोले यांनी सांगितले.

***

प्रतिक्रिया..

      सकाळच्या सुमारास रुग्णालयात गेलो असता रुग्णालय उघडण्याची वेळ ८:३० असून ९ वाजून १० मिनिटांनी सुद्धा रुग्णालयात कोणीही डॉक्टर कर्मचारी शिपाई वगैरे कोणीच नव्हते मला वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे मी डॉक्टरांना फोन केला असता त्यांनी मला सांगितले की रुग्णालय उघडेच आहे.

        पण,डॉक्टर क्वार्टर मध्ये आहेत.

शिलवंत रायबोले सामाजिक कार्यकर्ते नांदरून.‌