कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान : – छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे (नियोजन विभागा अंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मराठा, कुणबी, कुणबी – मराठा आणि मराठा – कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात मोफत राबविण्यात येत आहे.
पारशिवनी तालुक्यातील परमात्मा कॉम्पुटर तारसा रोड शहीद चौक हनुमान नगर कन्हान येथे छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे (नियोजन विभागा अंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, मोफत डिप्लोमा कोर्स मराठा, कुणबी, कुणबी – मराठा आणि मराठा – कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मोफत राबविण्या त येत आहे. रोजगारक्षमता व स्वयंरोजगार क्षमता वाढविणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विशिष्ट डिजिटल कौशल्ये, इंग्रजी भाषा कौशल्ये संभाषण कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवुन स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधीसाठी तरुणांना विकसित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी नोदणीच्या तारखेस उमेद्वाराचे वय १८ ते ४५ वर्षा दरम्यान असावे, उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे, प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहीवासी दाखला आवश्यक आहे. तसेच सारथीने नमुद केलेली वैध कागदोपत्री पुरावे सादर करावे लागणार आहेत. छत्रपती शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्या व्दारे समाजातील युवक युवती साठी हा अभ्यासक्रम मोफत शिकविला जाणार आहे. हा सहा महीन्याचा अभ्यासक्रम असुन १० हजार युवक – युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण एमकेसीएल च्या अधिकृत केंद्रा मार्फत दिले जाईल. ऑनलाईन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेत स्थळावर प्रसिध्द होणार आहे. १६ जानेवारी पासुन नोंदणी सुरु झाली असुन या करिता कुनबी, मराठा समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सुर्वण संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन पारशिवनी तालुक्यातील परमात्मा कॉम्पुटर हनुमान नगर कन्हान या एमके सीएल च्या अधिकृत केंद्रा व्दारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संकेत स्थळ : www.mkcl.org/csmsdeep प्रवेशा करिता परमात्मा कॉम्पुटर तारसा रोड शहीद चौक हनुमान नगर कन्हान मो न 9595025697 वर संर्पक करावा.