अमरावती (प्रतिनिधी)
अमरावती येथील प्रसिद्ध वकील ऍड धनंजय देशमुख यांच्या पत्नी सौ. मोहिका यांचे शनिवार दि 4 फेब्रुवारी ला नागपूर येथे दुःखद निधन झाले.त्या 35 वर्षांच्या होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून त्या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या.त्यांच्यावर अमरावती व नागपूर येथे उपचार सुरू होते.गेल्या नोव्हेंबर मध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यातून सावरत असतानाच गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्याना नागपूर येथे उपचारार्थ दाखल केले होते. त्यातच त्यांनी शनिवारी रात्री साडे आठ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
सौ.मोहिका यांच्या पश्चात पती ऍड धनंजय आणि लहान मुलगा ओंकार व इतर मोठा आप्त परिवार आहे. खापर्डे बगीचा मधील अशोक व सौ शुभांगी गुप्ते यांची त्या कन्या होत्या.
सौ.मोहिका यांची अंत्ययात्रा अशोक गुप्ते यांचे निवास स्थान,खापर्डे बगीचा, रंगोली हॉटेल जवळ येथून रविवारी सकाळी 10 वाजता निघाली अंबाघाट हिंदू स्मशान भूमी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बराच मोठा आप्त व मित्र परिवार उपस्थित होता.