खल्लार/प्रतिनिधी
खल्लार ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या लांडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे व गावातील स्मशानभूमीचे सौदर्यीकरण करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना गावातील नागरिकांना दिले आहे.
लांडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांचे पुतळे उघड्यावर आहेत त्यामुळे दोन्ही महापुरुषांचे पुतळे खराब होत आहेत त्या पुतळ्यांना घुमट बसविण्यात यावे व सौदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच लांडी येथील स्मशानभूमीचे बांधकाम बऱ्याच दिवसापासून पूर्ण झाले आहे.स्मशानभूमीचा वापर करणे सुरु झाले असून स्मशानभूमीत प्रेत नेताना पक्का रोड नाही पावसाळ्यात तर स्मशानभूमीत प्रेत नेताना नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो हा त्रास लक्षात घेता गाव ते स्मशानभूमी पर्यंत काँक्रीट रस्ता, हँडपंप, व स्मशानभूमीचे सौदर्यीकरण करण्यात यावे अशाही मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आमदार बळवंत वानखडे यांना दिले आहे निवेदन देतेवेळी खल्लार ग्राम पंचायतचे सरपंच योगेश अरुणराव मोपारी, जगदेवराव मोपारी, प्रकाश मोपारी, पंजाबराव इंगळे, नंदूभाऊ मोपारी, बाळूभाऊ इंगळे, बाबाराव इंगळे, जानराव इंगळे, संजय इंगळे, सुभाष इंगळे, रामचंद्र इंगळे, दुर्गेश इंगळे,योगेश इंगळे, नितीन तायडे, विनोद इंगळे, राहुल इंगळे, अमोल घुरडे, शुभम इंगळे, आशिष आठवले, कैलास इंगळे, गजानन इंगळे, प्रमोद इंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.