चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
मोहाडी : जि. प. शाळा विहिरगाव येथे दि. 05/02/23 ला वार्षिक स्नेहसम्मेलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यानिमित रात्री विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. रितेश वासनिक, प. स. सभापती मोहाडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पारधी शिक्षण व आरोग्य सभापती भंडारा, प्रमुख पाहुणे बबलूभाऊ मलेवार उपसभापती प.स. मोहाडी तसेच प्रभुजी मोहतुरे माजी बांधकाम सभापती भंडारा, दिलीप ढेंगे माजी उपसरपंच विहिरगांव, सोनु वैद्य, अध्यक्ष मोहाडी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, लक्ष्मण बोंद्रे भिखारखेड़ा, मुख्याध्यापक चव्हाण सर आणि संपूर्ण शिक्षकवर्ग, विद्यार्थी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे माध्यम म्हणजे स्नेहसंमेलन असे रितेश वासनिक यांनी भाषणात व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.