सत्र 2024-25 ची ग्रामपंचायत पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूली जोमात सुरु…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली :- दि.5 जानेवारी रविवारला म्हणजे सुट्टीचा दिवस असून सुद्धा ग्रामपंचायत पोटेगावचे प्रमुख पदाधिकारी कर्मचारी अर्चना सुरपाम सरपंच, एस. आर. पोटावी ग्रामसेवक पोटेगाव, आणि ग्रामपंचायत शिपाई दूधराम सुरपाम, जगदीश मोहुर्ले यांनी ज्या वरती थकीत घरटॅक्स आहे.

          त्याच्या इथे थेट जाऊन ग्रामपंचायत घरटॅक्स, पाणीपट्टी वेळेत भरण्याचे फायदे समजावून सांगत आहेत आणि त्या निमित्याने गावातील रस्ते, नालिकाम, दिवाबत्ती, पाण्याचे स्रोत योग्य आहेत काय हे सुद्धा तपासण्याचे काम मोठ्या झपाठ्याने ग्रामपंचायत पोटेगाव तर्फे केला जात आहे.