प्रलंबित नवीन मीटर कनेक्शनसाठी भाजयुमोचे ठिय्या आंदोलन… 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

भद्रावती :- प्रलंबित नवीन मीटर कनेक्शन त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी येथील भाजयुमो तर्फे शुक्रवारी येथील विद्युत वितरण कंपनीच्या आवारात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

          यावेळी सहायक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भद्रावती शहरातील अनेक नागरिकांचे व शेतकऱ्यांचे नवीन मीटर कनेक्शन संदर्भात विनंती केलेले अर्ज अजुनही मार्गी लागलेले नसून या संदर्भात नागरिकांमध्ये दिवसेंदिवस कार्यालयात भेट देऊन सुध्दा त्यांना आजवर नवीन मीटर कनेक्शन पासून वंचित राहावे लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून यासंदर्भातल्या प्रलंबित अर्जांची पुर्तता करून कायमस्वरूपी तोडगा काढावा.

         या ठिय्या आंदोलनात भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान, जिल्हा महामंत्री अमित गुंडावार, शहर अध्यक्ष विशाल ठेंगणे, शहर महामंत्री नाना हजारे, संघटन मंत्री राकेश खुसपुरे तसेच शिवा कवायतदार, प्रदीप लोणकर, चेतन स्वान, तौसिफ शेख, युगेश खोब्रागडे, श्रीपाद भाकरे, प्रज्वल नामोजवार, शिवा पांढरे, अश्विन सिद्धमशेट्टीवार, उमेश शिवरकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.