अश्विन बोदेले

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

 

 

 आरमोरी :- तालुक्यातील सुकाळा येथील माळी समाज संघटनेच्या वतीने 4 जानेवारी 2023 ला सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त डॉ. आबाजी मोहुर्ले होते. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष तुळशीदास वाढई पोलीस पाटील मोहझरी, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रदीप जी खोब्रागडे जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली हे होते.

      या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संपत आळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पूनम गुरनुले, सुकाळ्यातील सरपंच अविनाश कन्नाके, मोहझरी येथील सरपंच कोडाप, ग्रामपंचायत सदस्य भारत भैसारे, देवानंद जांभुळकर सर मुरमाडी ,सुकाळातील पोलीस पाटील चौधरी, मोहुरले मॅडम ग्रामपंचायत सदस्य, रमेश निकोडे, वैरागड येथील शिक्षक विजय गुरनुले, लोकमत वार्ताहर प्रदीप बोडणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी मुख्य मार्गदर्शन करताना सावित्रीमाई फुले यांचा जीवन संघर्षमय असून प्रेरणा देणारे जीवन चरित्र आहे. सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदा जेव्हा पाऊल उचलले तेव्हा या देशातील सनातनी ब्राह्मणांनी वैदिक संस्कृतीच्या विचारसरणीवर सावित्रीबाईंचे पदोपदी अपमान केले.

 त्यांना दगड शेनानी मारून अपमानित करण्याचे काम केले. तरी परंतु या छळाची तमा न बाळगता सावित्रीमाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांना शिक्षण दिले. व सावित्रीबाईंच्या संघर्षामुळेच या देशात स्त्रियांची मान उंचावली व स्त्रिया या देशांमध्ये आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, दलितांच्या मुख्यमंत्री झाल्या, आयएएस झाल्या, डॉक्टर झाल्या ,एडवोकेट झाल्या, आयपीएस झाल्या, सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची ज्वाला जर पेटवली नसती , तर स्त्री चूल आणि मुल च्या मर्यादित असत्या म्हणूनच सावित्रीमाई केवळ शिक्षिका नाही तर स्त्री शिक्षणाच्या उत्क्रांती होत्या .

पुढे मार्गदर्शन करताना 3 जानेवारी च्या पूर्वी एक जानेवारी येथे हा दिवस सुद्धा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे. वैदिक धर्मशास्त्रानुसार या देशातील बहुजन समाजाची विभागणी करून शूद्र आणि अतिसुद्र केल्या गेलं आणि त्यांना गुलाम करून गळ्यात गाडगा आणि कमरेला झाडू लावला गेला.

 या अन्यायाचा बदला 500 महारांनी 28 हजार पेशव्यांना कापून काढलं व भारतातील पेशवाई नष्ट केली व भारताला पेशव्यांच्या गुलामीतून मुक्त केलं. याच दिवशी एक जानेवारी 1848 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली व स्त्री शिक्षणाची नवी क्रांती निर्माण केली. परंतु या इतिहासाला दळपण्यासाठी नवीन वर्ष या नावाने प्रसिद्ध देऊन भारतातील बहुजन समाजाला मद्य धुंदीच्या नादात लावून या दिवसाचं महत्त्व कमी करण्याचा षडयंत्र या भारतामध्ये चालवला जातो.

 यापासून बहुजन समाजांनी व विशेष करून तरुणांनी सावध राहावं कारण तुमचा गौरवशाली इतिहास पुसण्याचे आटोकात प्रयत्न केले जात आहेत . म्हणून बाबासाहेब म्हणायचे “जो समाज अपना इतिहास नही जानता वो समाज अपना इतिहास नही बना पाता ” 

सनातनी संस्कृतीने वेळोवेळी या देशातील बहुजन महापुरुषांचा अपमानच केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा अपमान करण्यात आला. कारण या देशांमध्ये स्वार्थासाठी आणि पैशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. परंतु येथे बहुजनांच्या हक्क अधिकारांसाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या बहुजन महापुरुषांना प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न दिल्या जात नाही . 

बहुजनांचे नायक मान्यवर कांशीरामजींना भारतरत्न दिल्या जात नाही . एवढा अपमान आपल्या महापुरुषांचा होतो. या देशाला बाबासाहेबांनी 395 कलमांचा संविधान दिला .कारण महात्मा फुलेंच्या घराचा नंबर 395 होता आणि त्यामुळे महात्मा फुले यांच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ बाबासाहेबांनी भारताला 395 कलमांचा संविधान दिला व त्यामध्ये प्रामुख्याने 340 वा कलम या देशातील ओबीसी समाजाच्या उथानासाठी दिला परंतु त्या 340 व्या कलमांची अंमलबजावणी केली जात नाही.

 बाबासाहेबांनी या देशातील राज्यकर्त्यांना सांगितले होते की या देशातील 3743 जाती ओबीसी समाजाचे आहेत व त्यांच्या पोट जातीचा आकडा सिद्ध झाला नाही. त्यामुळे 340 व्या कलमानुसार सर्वांना समान संधी समान अधिकार देता यावे यासाठी सर्वात अगोदर ओबीसीची जातनिहाय जनगणना करा व त्यांचे अधिकार त्यांना बहाल करा. परंतु या देशातील काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना असो की इत्यादी कोणत्याही मनुवादी पार्टी या देशातील ओबीसी समाजाची जनगणना करत नाही. 

जनगणनेचा विषय निघाला की कोणत्यातरी अण्णा हजारे शंकराचार्य यांच्यासारख्या पंडितांना उभे करून भडकाव भाष्य करायला लावतात. कोणाच्या देवाधर्मावर टीका टिपणी करायला लावतात व जनगणनेच्या मुद्द्यावरून या देशातील मनुवादी गोदी मीडिया ओबीसी समाजाचे लक्ष भटकवण्याचे आटोकाठ काम करतात. या देशांमध्ये संविधानाची अंमलबजावणी केली जात नाही. कारण संविधान समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता शिकवते .माणसांना एकत्र जोडण्याची प्रेरणा देते. परंतु ह्या गोष्टीकडे आमच्या लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही .व त्यांना गरज सुद्धा वाटत नाही. कारण त्यांना संविधानचं समजलेला नाही .

कारण यांनी संविधान कधी वाचलाच नाही .वेळ आली तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनची स्पेलिंग सुद्धा यांना येत नाही. आणि त्यामुळे आम्ही यांना धडा शिकवल्याशिवाय चालणार नाही. तुमच्या शिक्षणाचे आणि जागृती चे फक्त पाच वर्षे असतात आम्ही पाच वर्षानंतर आपल्या मताचा योग्य वापर केला पाहिजे .जे आम्हाला काहीच देऊ शकत नाही तेव्हा मताधिकार वापरून फुले, शाहू, आंबेडकर विचार झालेला मोठा केला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी मताचा अधिकार देताना “वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू” हा संदेश दिला आहे. त्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक बंधू भावाने एकत्र यावे सर्वांनी समन्वय साधावे .

आमच्यावर अन्याय होत आहे कारण आम्ही सर्व जाती धर्माचे लोक विभक्त असल्याने होत आहे. आपण जाती ,धर्म, पंथ, भेद विसरून लढा दिला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात “गलत का विरोध खुलकर कीजिए चाहे राजनीती रहे या समाज क्योंकि इतिहास टकराने वालो का लिखा जाता है तलवे चाटने वालो का नही” 

या देशातील संपत्तीच्या फक्त दोन टक्के एवढा निधी या देशांमध्ये शिक्षणावर खर्च केला जातो. या देशातील संपत्तीच्या दीड टक्के एवढा निधी आरोग्यावर खर्च केला जातो. म्हणून आमचा शिक्षण मोठा होऊ शकत नाही. कुपोषणाने रोज आमच्या देशातील बहुजनांचे बळी जातात पण आमच्याच पैसा आमच्यासाठी खर्च केला जात नाही. आमच्या पैशावर गडगंज मस्तावलेले टाटा बिर्ला ,अंबानी आणि कारखानदार मजा मारतात.

 आमच्या देशातील 140 करोड जनते मधील 92 करोड जनता मिळून एकत्र केल्यावर जेवढा पैसा गोळा होतो तेवढा पैसा या देशातील केवळ 90 लोकांकडे अमाप पैसा अमाप संपत्ती जमा आहे. आमच्या देशामध्ये कर्जबुडव्यांची पैजच लागलेली आहे .भगोडे ,पडपूटे, कर्जबुडवे यांचे मात्र मनुवादी राज्य सरकार व केंद्र सरकार दहा लाख करोड एवढे कर्ज एका व्यक्तीचे माफ करतात. असे अनेक उदाहरणे देशामध्ये पाहायला मिळतात परंतु आमचा शेतकरी कर्जापाई आत्महत्या करतो हे शल्य कोणालातरी बोचते काय ? आमचा शेतकरी आत्महत्या करणार नाही. आमच्या बहुजनांच्या मुलींवर बलात्कार करून रात्रच्या रात्र जाळल्या जाणार नाही. आमचे मुले पैशाअभावी शाळा मुक्त होणार नाही. यासाठी सर्वांनी बहुजन आंदोलनात उडी घ्यावी. कारण “संघर्ष के लढाई मे न्योता नही दिया जाता जिसका जमीर जिंदा होता है वो अपने आप शामिल हो जाते है ” यामुळे “जिसके जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” हे आम्ही सिद्ध केलं पाहिजे. असे आवाहन प्रदीप खोब्रागडे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com