कमलसिंह यादव

  प्रतिनिधी

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे ६ जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २११ वी जयंती आणि मराठी पत्रकार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील परिसरात करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार एन.एस मालवीय , प्रमुख पाहुणे कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड , डॉ तेजस्वीनी गोतमारे , कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शन भरत सावळे आणि उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्तेआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली .

 

यावेळी वरिष्ठ पत्रकार एन.एस मालवीय , शशांक राठोड , मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवन चिरित्र्यावर प्रकाश टाकुन पत्रकार संबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले .

 

त्यानंतर मान्यवर आणि शहर विकास मंच पदाधिकार्यांच्या हस्ते कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार सदस्य, आरोग्य केन्द ने वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक राठोड , डॉ तेजस्वीनी गोतमारे यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

 

कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

 

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष सुरज वरखडे , कोषाध्यक्ष भुषण खंते , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , हरीओम प्रकाश नारायण , कृणाल राजपुत , प्रदीप गायकवाड , निलेश शेळके , योगराज आकरे , सह आदि मंच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News